ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भर दिवसा पाण्याची मोटार चोरताना पकडले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शहरातील त्र्यंबक नगर येथे आकाश रामदास खांडेभराड रा आंभोरा चिरबंदी बांधकामाचे काम करत असतांना आरोपी सतीश सुरेश पाटोळे रा पिंपळगाव चिलमखा ने पाण्याची मोटर टेक्सनो कंपणीची एक एच पी किंमत अंदाजे 8000/-रुची पांढरया रंगाचे पोतडीत पाइप व मोटारचे वायर कापुन चोरीचा प्रयत करतांना सापडला.
सदर घटना 23 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडली आकाश खांडेभराड यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल भास्कर सानप करीत आहे