Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्ष शंभरावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कौन्सिल चंद्रपूर च्या वतीने शहिद हुतात्मा स्मारक भद्रावती येथे नुकताच १०० वा शताब्दी वर्ष वर्धापन दिन ऐक दिवस विविध कार्यक्रमांनी आयोजित करण्यात आला.

           भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 26 डिसेंबर 1925 रोजी कानपुर उत्तरप्रदेश येथे झाली. बलिदानाची व अविरत संघर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष 26 डिसेंबर 2024 रोजी 99 वर्ष पूर्ण करून शंभर व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या शताब्दी वर्षाचे अनुसंघाणे संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे भद्रावती येथे सुद्धा विविध कार्यक्रम राभवून हा शताब्दी कार्यक्रम येथे पार पाडण्यात आला आहे. या वेळी कॉम्रेड प्रा. नामदेव कन्नाके जिल्हा सचिव मंडळ सदस्य चंद्रपूर यांच्या हस्ते ( ध्वजारोहन ) लाल झेंडा फडकवून सलामी व घोषणा देण्यात आल्या.

             ढोल ताशे, नगारा आतिषबाजी, कला नृत्य सादर करून मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला. त्या नंतर कॉम्रेड कार्ल मार्क्स, कॉम्रेड ऐगल्स, कॉम्रेड लेनिन, कॉम्रेड भगतसिंग, कॉम्रेड सुखदेव, कॉम्रेड चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड प्रकाश रेड्डी जिल्हा सचिव भा. क. पा. चंद्रपूर तर उद्घाटक कॉम्रेड रवींद्र उमाटे म. रा. कार्यकारणी सदस्य चंद्रपूर यांनी केले.

               कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक भद्रावती व जिल्हा सहसचिव चंद्रपूर हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित कॉम्रेड प्रकाश रेड्डी जिल्हा सचिव भा. क. पा. चंद्रपूर, कॉम्रेड रवींद्र उमाटे म. रा. कार्यकारणी सदस्य भा. क. पा. चंद्रपूर, कॉम्रेड प्रा. नामदेव कन्नाके जिल्हा सचिव मंडळ सदस्य चंद्रपूर,

कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन जिल्हा कार्यकारणी सदस्य भा. क. पा. भद्रावती, कॉम्रेड दत्ता कोंबे अध्यक्ष संयुक्त खदान मजदूर संघ ( आयटक ) माजरी एरिया भद्रावती, श्री. क. का. पावडे अध्यक्ष औद्योगिक खंड विकास शहरी व ग्रामीण कारागीर संस्था ( खादी ग्रामोद्योग ) भद्रावती, दिलीप ठेंगे सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक भद्रावती, पुंडलिक गोटे सामाजिक कार्यकर्ते व वेगळा विदर्भ आंदोलन समितीचे पदाधिकारी चंद्रपूर इत्यादी मान्यवर मंच्यावर उपस्तिथ होते.

पक्षात कामकरणाऱ्या आयटक मध्ये कामकारणारे संयुक्त खदान मजदूर संघ (डब्लु सी यल) बांधकामगार संघटना शालेय पोषण आहार आशा व गट प्रवर्तक अंगणवाडी – बालवाडी मध्ये काम करणारे व साहित्यिक लेखक कवी सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात वकील डॉक्टर क्रीडा क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करून सत्कार करण्यात आला. या नंतर प्रमुख पाहुण्याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

               या कार्यक्रमाचे संचालन कॉ. शाया मोहितकर यांनी केले तर प्रास्ताविक कॉ. नसरीन पठाण यांनी केले तसेच आभारप्रदर्शन कॉ. नितीन कावटी यांनी मानले.

            हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कॉ. वंदना गैनवार, कॉ. लता नन्नावरे, कॉ. आशा सोपानकर, कॉ. शेख खुर्शीद, कॉ. मगरे ताई, कॉ. शकील शेख, कॉ. नानी बोबडे, कॉ. सुरेखा टोंगे, कॉ. बंडू टोंगे, कॉ. सुनीता मेहर, कॉ. सुभद्रा मेश्राम, कॉ. अर्चना आसूटकर, कॉ. आशा झाडे, कॉ. पदमवीर यादव, कॉ. वामन मेश्राम, कॉ. सुभाष समर्थ इत्यादीनी अथक परीश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये