ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात समाजशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ.शेखर प्यारमवार

दिनांक ०९ सप्टेंबर २०२५ ला समाजशास्त्र विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाचे औचित्य साधुन शैक्षणिक सत्र २०२५-२६ करीता समाजशास्त्रराष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात समाजशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून समाजशास्त्र विषयाचे प्रा.डाॅ.पंडीत फुलझेले मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.ए.चंद्रमौली हे होते. डाॅ.पंडीत फुलझेले यांनी आपल्या भाषणातून आपली समाजव्यवस्था,शैक्षणिक व्यवस्था आणि विद्यार्थ्यांची भुमिका या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डाॅ.दिवाकर उराडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन समाजशास्त्र विषयाच्या विद्याथ्र्यांनी केले.

यावेळी समाजशास्त्र विषयातील उत्कृष्ठ विद्याथ्र्यांना पुस्तक आणि पेन देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमात बि.ए. प्रथम,व्दितीय व तृतीय वर्षातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये