ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परीक्षा विभागाचा ढिसाळ कारभार – अभाविप

चक्क प्रश्नपत्रिकेत उत्तरे देणाऱ्या परीक्षा विभागातील संबंधित प्राध्याकांवर कारवाई करण्यात यावी - अभाविप

चांदा ब्लास्ट

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. काल दिनांक १७ जुलै सोमवार रोजी अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या इन्फर्मेशन थेअरी अँड कोडिंग या सहाव्या सत्राच्या पेपरमध्ये परीक्षा विभागाकडून चक्क प्रश्नपत्रिकेतच उत्तर आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे.

विद्यापीठ दर वर्षी परीक्षा घेत असून देखील अद्यापही परीक्षेचे योग्य व्यवस्थापन करता न येणे  म्हणजे विद्यापीठाचे एक प्रकारे अपयश आहे. परीक्षा सारख्या महत्त्वाच्या व्यवस्थापनेतील अनियोजनासाठी प्रशासकीय अधिकारी हे किती बेजबाबदार आणि अकार्यक्षम आहेत असे लक्षात येते.

अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री शक्ती केराम म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठातील परीक्षांचे गोंधळ, विद्यार्थ्यांना होणारा नाहक त्रास, व्यवस्थापन शून्य परीक्षा यामुळे विद्यापीठाची बदनामी होत आहे. परिक्षा संचालकांची तात्काळ चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी. तसेच  विद्यापीठाचा हा अनागोंदी कारभार बंद करावा अशी मागणी अभाविप विदर्भ प्रदेश करत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील परिक्षा विभागात सातत्याने ढिसाळ कारभार सुरू आहे हे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. १७ जुलै रोजी झालेल्या इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगच्या इन्फॉर्मेशन थिअरी अँड कोडींग या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाकडून उत्तरे देण्यात आले. असे कृत्य करणे हे  विद्यापीठाचे एक प्रकारे विद्यार्थ्यांप्रती असलेले निष्काळजीचे लक्षण आहे. विद्यापीठ प्रशासन वारंवार अशा चूका करून हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळत आहे. त्यामूळे विद्यार्थ्यांना सातत्याने मानसिक,आर्थिक त्रास सहन करावा लागतो. म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यापीठ प्रसानाकडे मागणी करतेय की प्रश्नपत्रिकेत झालेल्या त्रुटी मध्ये जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींची व परीक्षा संचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.अन्यथा विद्यार्थ्यांच्या नुकसानीस जबाबदार असलेल्या विद्यापीठ प्रशासनास विद्यार्थ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये