ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्षावास निमित्त प्रवचन मालिका व ग्रंथवाटप कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट

घुग्घुस :_  दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी बुधवारच्या दिवशी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष किशोर तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली तसेच यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिता देशकर यांच्या वतीने वर्षावास निमित्त प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील दर बुधवार दुपारी १ वाजता ही प्रवचन मालिका घेण्यात येत आहे.

या कार्यक्रमात प्रा. रवी कांबळे लिखित संपूर्ण बौद्ध सण, धम्मदर्शन आणि बुद्धं सरणं गच्छामि हे तीन ग्रंथ घुग्घुस येथील विविध बौद्ध विहारांना विनामूल्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये पंचशील बुद्धं विहार, सारिपुत्त बुद्धं विहार, महाप्रज्ञा बुद्धं विहार, चैत्यवन बुद्धं विहार, तक्षशीला जनजागृती महिला मंडळ, आम्रपाली बुद्धं विहार, नवयुवक बुद्धं विहार, नवबौद्ध स्मारक समिती, मिलिंद वाचनालय बुद्धं विहार, सिध्दार्थ गौतम बुद्धं विहार, शांती बुद्धं विहार व रमाई बुद्धं विहार या प्रमुख विहारांचा समावेश होता.

ग्रंथवाटपानंतर प्रवचन मालिकेला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिता देशकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंत निखाडे यांनी केले.

या वेळी विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, कार्याध्यक्ष चंद्रगुप्त फकरु घागरगुंडे, कोषाध्यक्षा वैशाली निखाडे, सरोजताई पाझारे, सविता मंडपे, दिक्षा भगत, श्याम कुम्मरवार, शिल्पा सोंडुले, वैशाली भालशंकर, सोहम पाटील, मीना गुडदे, ज्योती बेंडले, अल्का करमणकर तसेच घुग्घुस येथील सर्व बुद्धं विहार समित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये