ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (उबाठा)च्या ११ संचालकासह १४ संचालकाचा भाजपात प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना उबाठा गटाची सत्ता असताना सभापती यांच्यावर अविश्वास पारित झाल्यानंतर उरलेल्या शिवसेना (उबाठा) ११ संचालकासह काँग्रेसच्या तीन संचालकांनी भाजपा प्रवेश घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माझी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली दि. २ सप्टेंबरला भद्रावती येते कृषी उत्पन्न बाजार समितीचे १८ संचालका पैकी १४ संचालकांनी भाजपात प्रवेश घेतला. यावेळी आमदार करण देवतळे, रमेश राजूरकर, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सुनील नामोजवार आदी यावेळी उपस्थित होते.

शिवसेना उबाठाचे सभापती भास्कर ताजणे यांच्यावर १५ संचालकांनी अविश्वास टाकला त्यानंतर ५ सप्टेबरला अविश्वास पारित झाला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे हे एका महिण्यापूर्वी भाजपात गेल्या नंतर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपाच्या खे म्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या त्यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाठाचे उपसभापती आश्लेषा भोयर, संचालक गजानन उताणे, विनोद घुगुल, ज्ञानेश्वर डुकरे,मनोर आगलावे, श्यामदेव कापटे, परमेश्वर ताजने, शांताबाई रासेकर, शरद जांभुळकर, कानोबा तिखट, मोहण भुक्या यांना भाजपा सामील केले तर काँग्रेसचे राजेंद्र डोंगे, अनिल चौधरी,राजू आसुटकर अशा १४ संचालकांना भाजपात प्रवेश घेतल्याने आता सभापतीपदासाठी भाजपाचा रस्ता साफ झाला आहे.

शिवसेना (उबाठा) व काँग्रेसचे संचालक भाजपत गेल्याने राजकीय वर्तुळात आता चांगलीच खडबड उडाली आहे

तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रोहन कुटेमाटे,विश्वास कोंगरे, अरुण घूगूल, सतीश वरखडे, पवन नगराळे यांनी सुद्धा भाजपत प्रवेश घेतला आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये