ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकातर्फे शिवणी पारधी बेडा येथे धडक वॉशआऊट मोहिम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांचे आदेशान्वये, दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने अवैधदारू निर्मीती व विक्री करणा-या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची मोहिम राबविली असता, सदर मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन. समुद्रपुर हद्दीतील मौजा शिवणी पारधी बेडा येथे धडक वॉशआऊट मोहिम राबविण्यात आली, सदर मोहिमेदरम्यान 123 प्लास्टीक व लोखंडी ड्रममध्ये 16,450 ली. मोहा सडवा रसायण व 270 ली. गावठी मोहा दारू व इतर भट्टी साहित्य जु.कि. 18,29,200 रू चा मुद्देमाल जप्त करून, जागीच नाश करण्यात आला असुन, आरेापी नामे 1) सुनेकला काळे, 2) प्रतिकार पवार, 3) कुमान पवार, 4) चरणदास पवार, 5) शिवणकला पवार सर्व रा. शिवणी पारधी बेडा, तह. समुद्रपूर यांचेविरूध्द पोलीस स्टेशन समुद्रपुर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

 सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, पवन पन्नासे, महादेव सानप, रवि पुरोहित, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये