ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारु विक्रेत्यांवर वर्धा पोलीस दलाचा सर्जीकल स्ट्राईक

160 गुन्ह्यात एकुण 1 कोटी 95 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सतत पाउस येत असल्याचा फायदा घेवून अवैधरित्या दारुचा व्यवसाय करणारे यांनी अवैध दारु तयार करण्याकरिता गावाबाहेर, जंगल शिवारात, जाण्या-येण्यास अडचणीचे ठिकाणी गावठी दारुच्या मोठ्या प्रमाणात भट्ट्या लावल्या आहेत, याबाबत पोलीसांनी गोपनियरित्या माहीती काढून अशा ठिकाणावर मागील पाच ते सहा दिवसापासून लक्ष केंद्रीत करुन गुप्तरित्या पाळत ठेवण्यात आली तसेच अवैध दारु गाळणारे व पुरवठादारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्यांचे GPS द्वारे लोकेशन ट्रैक करण्यात आले.

जिल्ह्यात आगामी गणेश उत्सव व गणेश विसर्जन सणानिमीत्त वर्धा पोलीस दल बंदोबस्तात व्यस्त असल्याचा अवैध दारुविक्रेत्यांना समज निर्माण झाल्याने अवैध दारु विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारु गाळण्याच्या भट्ट्या तयार केल्याने त्यांचेवर अचानकपणे कारवाई करण्यासाठी काल दि. 30/08/2025 रोजी श्री अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेवून पहाटे चार वाजतापासून श्री सदाशिव वाघमारे अपर पोलीस अवर्धा जिल्ह्यातील चार उपविभागीय पोलीस अधिकारी, 19 ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखेचे व इतर शाखेचे असे 626 पोलीस अंमलदार यांचे 19 पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे पथके तयार करुन या सर्व गावठी दारुभट्टीच्या ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली त्यातून जिल्ह्यात एकुण 165 आरोपींवर 160 गुन्हे दाखल करुन 1 कोटी 95 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व नाश केला. तसेच या कारवाईत नवीन कायद्याप्रमाणे ‘ई’ साक्ष अॅप्लीकेशनचा वापरुन तांत्रीक पुरावे गोळा केले.

अशा प्रकारे पोलीसांनी येणा-या गणेश विसर्जन सणामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहणेकरिता व दारु विक्रेत्याकडून कोणतेही व्यत्यय येणार नाही म्हणून अचानकरित्या सर्जीकल स्ट्राईक केला या पोलीसांच्या कारवाईमुळे अवैद्यरित्या दारु तयार करणारे, पुरवठादार व विक्रेते यांचे धाबे दणाणले आहे व भविष्यात सुद्धा कोणत्याही उत्सवात व्यत्यय निर्माण होउ नये व सर्व सण-उत्सव शांततेने पार पाडण्याच्या उद्देशाने अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल.

यापूर्वीसुद्धा अवैद्य दारु विक्रेत्यांवर वेळोवेळी कठोर कारवाई करण्यात आली असून यावर्षी आतापर्यंत एकून 14 अवैध दारुविक्रेत्यांना MPDA कायद्याअंतर्गत तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले आहे व 125 अवैध दारु विक्रेत्यांना वर्धा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच काल केलेल्या कारवाईमध्ये आरोपींचा रेकॉर्ड तपासून त्यांचेविरुद्ध सुद्धा अशाप्रकारची कडक कारवाई करण्यात येणार आहे.

वर्धा जिल्ह्यात अवैध दारुचे कोणतेही प्रकार चालणार नाही असे स्पष्ट संकेत श्री अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिले आहे. तसेच वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध्य दारुबाबत कोणतीही माहीती असल्या पोलीसांना कळवावे त्या दारुविक्रेत्याविरुद्ध सुद्धा अशा प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये