ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा जिल्हा महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे सूचनेवरून भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बुलढाणा जिल्हा महिला मोर्चाच्या घाटावरील भागासाठी अध्यक्ष म्हणून देऊळगाव राजा येथील सविता संजय पाटील यांची नियुक्ती केल्यानंतर पाटिल यांनी चिखलीच्या आमदार श्वेता महाले व मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांचे सोबत विचार विनिमय करून सर्व समाजाला प्रतिनिधित्व करता यावे व महिलांचे संघटन अधिक मजबूत व्हावे यासाठी दिनांक 29 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हा महिला मोर्चा ची जंबो कार्यकारिणी जाहीर केली आहे यामध्ये सरचिटणीस चार,उपाध्यक्ष ८, सचिव ६ तर सदस्य ४ अशी जम्बो यादी जाहीर करून सर्व नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटनेचे काम युद्ध पातळीवर करण्याचा कानमंत्र जिल्हाध्यक्ष सविता पाटील यांनी दिला आहे.

जिल्हा कार्यकारीनिमध्ये सरचिटणीस अलका अतिन पाठक, पल्लवी मल्हार वाजपे, चित्रा भगवान पुरी, सिंधुताई तायडे, उपाध्यक्ष उषा पवार, अर्चना दीपक पांडे, पुनम जैस्वाल ,शीला खाडे, सुनिता नारायण सानप, सुनिता प्रकाश राजवते, सुनीता सुदर्शन भालेराव, निता जैन,सचिव -रेवती सुंदर आढाव, पार्वती काने,अनिता शिंगणे,प्रिया दीपक मालवे, अर्चना कबुतरे, सुनंदा श्रृंगारे, सदस्य श्रुती प्रदीप घिके,कोमल किसन राठोड, ज्योती ताठे, तर चिखली तालुका अध्यक्ष म्हणून निता सोळंकी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सर्व नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे बुलढाणा येथील भाजपाच्या कार्यालयामध्ये भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी यथोचित सन्मान करून सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये