शेणगावात गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील शेणगाव येथे गांजाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ८६० ग्रॅम गांजा किंमत ८६०० रू. जप्त करण्यात आलेला आहे. संभाजी उर्फ पिंटू शिवाजी कत्ते (वय ३९) रा. शेणगाव असे आरोपीचे नाव आहे.
मौजा शेणगाव येथे राहणारा आरोपी संभाजी उर्फ पिंटू शिवाजी कत्ते हा आपले घरी अवैध रित्या गांजा बाळगून चिल्लर विक्री करीत आहे अशी गोपनीय बातमी जिवती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे आरोपीचे घराचे झडती करीता पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पथक तयार केले पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव,पोलिस उपनिरिक्षक निखिल रहाटे,पोलिस हवालदार नारायण गवाले,पोलीस अंमलदार जगदीश मुंडे, ज्ञानेश्वर डोकळे,किरण वाठोरे,भाविक टेकाम,अभिषेक आडे,महिला पोलिस अंमलदार प्रियांका राठोड,शिल्पा कातकर यांनी दोन पंचासमक्ष सदर आरोपीचे घराची घर झडती घेतली असता त्याचे घरातील किचन रूम मध्ये निळ्या रंगाच्या ड्रममध्ये ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एकूण ८६० ग्रॅम वजन असलेला गांजा किंमत ८६०० रू. मिळून आल्याने सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन जिवती येथे अप क्र. ११४/२०२५ कलम ८ (क) २० (ब) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिक १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्यात आरोपी नामे संभाजी उर्फ पिंटू शिवाजी कत्ते (वय – ३९) रा. शेणगाव याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन जिवती येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल रहाटे हे करीत आहेत.