“संचित धनावत यांच्या घरी गणपती बाप्पाची इको फ्रेंडली सजावट”
नेहा संचित धनावत यांनी केली वारली पेंटिंग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणरायाचे आगमन झाले असून घराघरांमध्ये व चौकात चौकामध्ये सार्वजनिक गणेश मंडळात श्री गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे आज पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेता इको फ्रेंडली गणपती बाप्पा व सजावटीची अत्यंत आवश्यकता आहे पर्यावरणाला मारक ठरणारे थर्माकोल व इतर प्लास्टिक वस्तूंचा वापर न करता नैसर्गिक वस्तूंचा वापर करून देऊळ गाव राजा येथील संचित धनावत यांच्या घरी इको फ्रेंडली सजावट करण्यात आली असून, त्यांनी व सौ नेहा धनावत व संपूर्ण धनावत परिवाराने पर्यावरण पूरक सजावट केली आहे, त्यासाठी त्यांनी एक ग्रामीण भागातील झोपडी सारखी दिसणारी सजावट केली असून त्या झोपडी मध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली आहे त्यासाठी खपटांचा, कागदांचा व आपल्या झोपडीच छत करण्यासाठी त्यांनी ज्वारीच्या वाळ लेल्या ताटांचा उपयोग केला असून अतिशय सुंदर व नयनरम्य गणपती बाप्पांची झोपडी तयार झाली आहे
त्याचबरोबर त्यांच्या पत्नी व वहिनी यांनी स्वतः मेहनत घेऊन बाजूच्या भिंतीवर ज्या खपटाच्या व कागदाच्या बनलेल्या आहेत त्या भिंतीवर वारली पेंटिंग केली असून भारताच्या कला व संस्कृतीचे दर्शन होत आहे
त्यामुळे गणरायाचं रूप जे आहे त्याच बाजूला कृषी प्रधान देशांमध्ये भारताची जी कृषी संस्कृती आहे त्या संस्कृतीचे दर्शन सुद्धा त्या बाजूच्या दृश्यामध्ये दिसत आहे त्या ठिकाणी भूमी व त्याचबरोबर त्या भूमीमध्ये प्लास्टिकचे गवत न ठेवता प्रत्यक्ष गवताची पेरणी त्यांनी केलेली दिसत आहे आपल्या या संस्कृतीचं महान संस्कृतीचे दर्शन यामधून घडविले आहे
यासाठी आई कल्पना सुभाष धन्नावत सून रोशनी व नाथ प्रिशा यानी मेहनत घेतली
संपूर्ण नगरामध्ये या गणरायाची ईको फ्रेंडली आकर्षक सजावटी साठी चर्चा होत आहे