ब्रह्मपुरी व तालुक्यातील कृषी केंद्रामधून शेतकऱ्यांची आर्थिक लुट थांबवा
ब्रह्मपुरी मनसेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- सध्या शेती हंगाम सुरू असुन हल्ली च्या परिस्थितीत युरिया या खताची शेतकऱ्यांना अत्यंत गरज असून ब्रह्मपुरी व तालुक्यात सर्व कृषी केंद्रांमध्ये युरिया खताच्या स्टॉक उपलब्ध असताना सुद्धा शेतकरी हा कृषी केंद्रात युरिया खत घेण्याकरिता गेल्यानंतर युरिया खत उपलब्ध नाही.
दोन-तीन दिवसात उपलब्ध होईल असे सांगितले जाते किंवा एखाद्या कृषी केंद्रामध्ये युरिया खत उपलब्ध असेल तर सोबत अन्य मिश्र खत घेत असाल तरच युरिया खत मिळेल किंवा शेतकऱ्याला एका बॅगेची आवश्यकता असल्यास त्या शेतकऱ्यांना किमान तीन चार बॅग घ्याव्या लागेल असा सबळ दम देऊन त्यांना कृषी केंद्र बाहेर हाकलून दिल्या जात आहे.
मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक रित्या कृषी केंद्राच्या संचालकांच्या संगनमताने त्रास देणे सुरू आहे त्याचप्रमाणे युरिया खताची 45 किलो ची बॅग ही 266 रुपये असून सुद्धा प्रत्येक कृषी केंद्रावर ज्यादा दराने विक्री सुरू आहे मात्र मशीनच्या प्रिंट पावती मध्ये प्रति बॅक ही 266 दिली जाते प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे युरिया खताचा पुरवठा व्हावा तसेच प्रिंट नुसारच कृषी केंद्रांनी शेतकऱ्यांकडून पैसे घ्यावा एवढीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे तरी जगाच्या पोशिंदाला आपल्या विभागाने येत्या आठ दिवसात अशा मुजोर कृषी केंद्रावर कारवाई केली नाही किंवा न्याय मिळाला नाही तर आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष सुरज भाऊ शेंडे यांनी निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी ब्रह्मपुरी यांना दिला.
यावेळी ओमप्रकाश सोनटक्के तालुका उपाध्यक्ष माया सिंह बावरी तालुका उपाध्यक्ष अशोक दुनेदार तालुका संघटक आशीष देशमुख आदित्य धोंगडे उपस्थित होते