घुग्घुसमध्ये भव्य तान्हा पोळा उत्सव आणि बक्षीस वितरण सोहळा

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही गांधी चौक येथे जनसंपर्क कार्यालय मनसे घुग्घुस तर्फे भव्य तान्हा पोळा उत्सव व बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष घुग्घुस सुमित कोहळे, तालुका उपाध्यक्ष चंद्रपूर पंकज राजपूत, शहर उपाध्यक्ष निशांत ठाकरे, निखिल बोबडे, कामगार सेना अध्यक्ष श्रीकांत देठे, कपिल शिरसागर, शुभम तिगलवार, आदित्य गज्भ्ये व इतर मनसैनिक यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष मनसे मनदीप रोडे, शहर उपाध्यक्ष बाळा चंदनवार, संदीप आरडे यांनी अध्यक्षस्थानी राहून बालगोपालांना प्रोत्साहित केले व जनतेला शुभेच्छा दिल्या.
मनोगत व्यक्त करताना मनदीप रोडे व बाळा चंदनवार म्हणाले, “तान्हा पोळा व बैल पोळा साजरा करणे ही आपली संस्कृती आहे. या निमित्ताने सर्व धर्मीय एकत्र येतात आणि समाजात एकोपा वाढतो. बालगोपालांनी दाखवलेली सर्जनशीलता, छोट्या नंदीबैलांच्या मिरवणुका आणि निरागस आनंद पाहून मन प्रसन्न झाले. आपल्या परंपरेचं जतन आणि संवर्धन हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अशा कार्यक्रमांतून समाजात ऐक्य, आपुलकी आणि संस्कृतीची मुळे अधिक घट्ट होतात.”
कार्यक्रमाच्या शेवटी मनसे घुग्घुस तर्फे तान्हा पोळ्यात सहभागी झालेल्या सर्व बालगोपालांना प्रोत्साहन म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच सर्व ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांना शुभेच्छा देत आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले.