शालेय क्रीडा स्पर्धेत लोकमान्य ज्ञानपीठाने पटकाविले सुवर्ण आणि रौप्य पदक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नुकत्याच वरोरा येथे पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत तायक्वांडो खेळात येथील लोकमान्य ज्ञानपीठाने सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवून घवघवीत यश मिळवले आहे.
या शालेय क्रीडा स्पर्धेत ग्रामीण व शहरी भागातील संपूर्ण शाळांनी सहभाग दर्शवला होता. त्यात १५० हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला. या सर्वांचा पराभव करत लोकमान्य ज्ञानपीठ मधील विद्यार्थ्यानीं सुवर्ण पदक पटकावत विभागीय स्तरावर झेप घेतली. त्यात अनुराग राजपूत याने १७ वर्षांखालील वयोगटात सुवर्ण पदक पटकावले.तर मधुमिता नागपुरे व वेद तुराणकर यांनी रौप्य पदक पटकावले.
तसेच बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सुद्धा लोकमान्य ज्ञानपीठ मधील विद्यार्थिनी तिथी वाघमारे हीने पहिला क्रमांक पटकावून जिल्हा स्तरावर आपले स्थान पक्के केले. या सर्व यशस्वी खेळाडूंचे लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, लोकमान्य ज्ञानपीठाच्या प्राचार्या पूनम ठावरी, क्रीडा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक करत पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.