मुलांनी सादर केलेले देखावे अतिशय प्रेरणादायी : दिनेश चोखारे
हनुमान चौक दुर्गोत्सव मंडळ ताडाळी तर्फे तान्हा पोळा उत्सव उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
“शेतकरी, सैनिक, संत, पर्यावरण संवर्धन, स्वच्छ भारत अभियान यांसारख्या विषयांवर मुलांनी सादर केलेले देखावे अतिशय प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादापाटील चोखारे यांनी यांनी व्यक्त केले.
ताडाळी येथील हनुमान चौक दुर्गोत्सव मंडळा तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात लहानग्यांनी पारंपरिक नंदी सजावट, रंगीबेरंगी वेशभूषा तसेच सामाजिक संदेशांवर आधारित देखावे सादर करून सर्वांचे मन जिंकले.
पुढे बोलतांना दिनेश दादापाटील चोखारे म्हणाले कि, ग्रामीण भागात अशी परंपरा जोपासून सामाजिक जाणीव निर्माण करणे ही खरी सांस्कृतिक ताकद आहे. या उपक्रमातून मुलांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित होतात. समाजातील प्रत्येक घटकाने मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे,”
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादापाटील चोखारे उपस्थित होते. त्यांच्यासह सौ. संगीताताई पारखी (सरपंच), निखिलेश चामरे (उपसरपंच), संजोग अडबाले (ग्रामपंचायत सदस्य), संदीप कासवटे, सुबोध कासवटे, स्वप्नील देशमुख (पोलिस पाटील), कमलाकर दिवसे, भालचंद्र डेरकर, संतोष झाडे, गोपाला उगे आदी मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून अॅड. देव पाचभाई आणि अविनाश पोइणकर सर यांनी उपस्थित राहून मुलांच्या सादरीकरणाचे परीक्षण केले.
बालकांनी शेतकरी, संत, सैनिक, पर्यावरण संरक्षण, स्वच्छ भारत अभियान यांसारख्या विषयांवरील आकर्षक देखावे सादर केले. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात रंगलेल्या या कार्यक्रमात मुलांच्या कलागुणांचे सर्वत्र कौतुक झाले. विजेत्या बालकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम ताडाळी ग्रामपंचायतच्या पटांगणावर पार पडला. गावकरी, पालक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालकांच्या उत्साहाला दाद दिली आणि उत्सवाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हनुमान चौक तान्हा पोळा समिती व मंडळाचे कार्यकर्ते :
दिलीप भाऊ उगे, कवडू दिवसे, राहुल शेंडे, राजू आखरे, किशोर आखरे, ईश्वर आखरे, प्रदीप दिवसे, अनिल पारखी, रितेश शेंडे, प्रकाश चिकराम, सोनल दिवसे, सचिन वरारकर, शुभम आसेकर, दिनेश उगे, प्रवीण दिवसे, अमर चौधरी, स्वप्नील मेश्राम, प्रफुल पारखी, अक्षय उगे, अमित पारखी, विकास ठेंगणे, रोहन शेंडे, प्रियांशू आखरे, यश दिवसे, लोकेश चौधरी, तुषार ननावरे, बादल जुनघरे, नैतिक रोहने, यश जयस्वाल, सुजल श्रीगिरिवार, दादू उगे, आयुष आखरे, अथर्व आखरे, दुशांत आखरे यांनी परिश्रम घेतले.
मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, परीक्षक, दाते, ग्रामस्थ तसेच मंडळाचे कार्यकर्ते यांचे हनुमान चौक दुर्गोत्सव मंडळ ताडाळी तर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.