ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयुध निर्माणी वसाहतीत कर्मचारी खेळत होते जुगार

पोलिसांनी केली सात आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           पोळा सनानिमित्त आयुध निर्माणी वसाहतीत बावन तास पत्त्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळत असताना भद्रावती पोलिसांनी धाड टाकून रोख रक्कम व मुद्देमालासह सहा आरोपींना अटक केली ही कारवाई दिनांक २३ ला मध्यराती करण्यात आली.

यातील राहुल बापूराव खोब्रागडे वय ४४, सचिन विठ्ठल दुर्गे ४५, रवींद्र मारोती नागपुरे ४९, प्रतीक हरिदास रंगारी ३४, विकसशील प्रभु राजुरकर ४१, संतोष कुमार ओमप्रकाश सिंग ४५, धर्मेंद्र विठ्ठलराव वंजारी ४१ असे जुगार खेळत असताना अटक झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तर गुलाब चौधरी असे एका फरार आरोपीचे नाव आहे.

आयुध निर्माणी वसाहतीत टाईप २ सेक्टर १ मध्ये ५२ तास पत्त्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्या आधारे ठाणेदार योगीराज पारधी यांच्या मार्गदर्शनात सपोनि संजय मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम, गजानन तुपकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाड, गोपाल आक नुलवार, संतोष राठोड, योगेश घाटोळे, खुशाल कावडे यांनी धाड टाकून यांनी डावा वरील रोख रक्कम १८ हजार चार दुचाकी सहा मोबाईल असा दोन लाख तेरा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये