बिबी येथे तान्हा पोळ्यातून बालगोपालांनी केली माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबीच्या वतीने माजी वसुंधरा अभियानावर आधारित तान्हा पोळा स्पर्धेचे आयोजन पार पडले. स्पर्धेत प्रथम पारितोषिक कृतिका बोबडे, द्वितीय पारितोषिक भाविक थेरे, तृतीय पारितोषिक साई टोंगे, चतुर्थ पारितोषिक हर्षिता घुगुल यांनी पटकाविले.
या स्पर्धेत एकूण 56 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून उर्वरित सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालकांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला माजी सभापती साईनाथ कुळमेथे, सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच आशिष देरकर, पोलिस पाटील राहुल आसुटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष स्वप्नील झुरमुरे, ग्रा. पं. सदस्या भारती पिंपळकर, सदस्य राजु नन्नावरे, सुरज कुळमेथे, आनंदराव पावडे, देविदास काळे, शेख रशीद, श्रावण चौके, उत्तमराव काळे, रामदास देरकर, कवडू पिंपळकर, चरणदास कोट्टे, दादाजी भेसुरकर, रामदास डवरे, मुरलीधर खाडे, देवराव आष्टेकर, शालिकराव बेरड, पांडुरंग मोरे, देवराव गिरडकर, मधुकर ढवस, शंकर वाभिटकर, रामदास सोनटक्के, विजय हंसकर, प्रकाश बोंडे, सतीश चौधरी, फिरोज शेख, एकनाथ सोनुले, वसंता चरडे, केशवराव टोंगे, लक्ष्मण डाखरे, रामचंद्र धोंगळे, नितेश बेरड, संदीप पावडे, प्रमोद विरुटकर, गणेश बोबडे, राजेश खनके, राकेश सोनटक्के, सतीश कोट्टे यांचेसह गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण मटाले सर, राजू पिंपळकर, अखिल अतकारे व मनीषा धुर्वे यांनी केले. संचालन विठ्ठल टोंगे यांनी केले.