ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिवाजी चौकात रस्त्यावर पडलेली नाली वाहनधारकांसाठी ठरते डोकेदुखी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
शहरातील शिवाजी चौक गुजरी परिसर हा मुख्य वर्दळीचा भाग असून येथून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. मात्र, या मुख्य रस्त्यावर नालीसारखा खोल गेलेला भाग तयार झाल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या मधोमध खड्ड्यासारखा पट्टा पडल्यामुळे दोन चाकी,चार चाकी गाड्या चालविणाऱ्यांना संतुलन राखणे अवघड झाले आहे.अचानक धक्का बसल्याने अपघात होण्याची शक्यता कायम आहे. विशेषत: संध्याकाळच्या गर्दीत हा त्रास अधिक जाणवतो.
स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून तात्काळ दुरुस्ती करून रस्ता सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे.