ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरूदेव सेवा मंडळ, घुग्घुस येथे आध्यात्मिक मार्गदर्शन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट

घुग्घुस :_ गुरूदेव सेवा मंडळ, घुग्घुस येथे शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ११ वाजता आध्यात्मिक विश्वविद्यालय तर्फे विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सेवेसाठी प्र. ब्र. कु. दिलीप ठाकरे निमित्त बनले.

“सारे विश्व वसुधैव कुटुंबकम् कसे बनेल” या विषयावर प्र. ब्र. कु. वर्षामाता मदनकर व प्र. ब्र. कु. दिलीपराव मदनकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की – “सारी वसुंधरा हे एकच कुटुंब आहे, आणि त्या कुटुंबाचा कर्ता तोच असतो ज्याला सर्व धर्मांचे लोक माता-पिता मानतील. तोच खरा जगद्गुरू असेल, जो जगाच्या कल्याणासाठी सिद्ध होईल. पण अशा व्यक्तिमत्त्वाची ओळख मिळविण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःची ओळख करून घ्यायला हवी. मी कोण? कुठून आलो? आणि मला कुठे जायचे आहे? हे प्रश्न समजून घेतले तरच जगद्गुरूची खरी ओळख पटेल.”

कार्यक्रमाची सुरुवात प्र. ब्र. कु. वर्षामाता मदनकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या प्रसंगी जेष्ठ नागरिक तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रसाद वितरणाने झाला.

 सदर सेवेसाठी प्र. ब्र. कु. दिलीप ठाकरे निमित्त बनले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये