चंद्रपूर महानगर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने बहिणींनकडून संकलित केलेल्या तब्बल २८,२१२ राख्यां मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीसांपर्यंत पोहोचविला जनतेचा विश्वास आणि प्रेम

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महानगर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने बहिणींनकडून संकलित केलेल्या तब्बल २८,२१२ राख्यां मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीसांपर्यंत पोहोचविला जनतेचा विश्वास आणि प्रेम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी रक्षाबंधनानिमित्त भगिनींनी पाठवलेल्या राख्यांच्या संकलनाचा भव्य उपक्रम महाराष्ट्रभर उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून चंद्रपूर महानगर भारतीय जनता पक्षाने तब्बल २८,२१२ राख्यांचे संकलन करून त्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविल्या.
या सोहळ्याला आमदार किशोरभाऊ जोरगेवार, जिल्हाध्यक्ष इंजी. सुभाष कासनगोटटूवार, महामंत्री श्री.रवी गुरनुले, सौ. सविताताई दंडारे, माजी महामंत्री श्री. नामदेव डाहूले, मंडळ अध्यक्ष श्री. स्वप्निल डुकरे, मंडळ अध्यक्ष श्री. सुभाष अदमने , सौ. विमल काटकर, सौ मुग्धा खांडे, सौ. कल्पनाताई बागुलकर, मंडळ अध्यक्ष सौ सरिकाताई संदुरकर, श्री. विनाश उत्तारवार , श्री.जयकुमार सिंह, श्री.राकेश बोमनवार, श्री.अक्षय घोटेकर, श्री.चंद्रशेखर शेट्टी, श्री.नकुल वसामवार, श्री. संजय सिंह, श्री. राजू शस्त्रकार, श्री. राजकुमार आकापल्लिवार, सौ. सीमा मडावी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
याप्रसंगी आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत या माझ्या बहिणींनी देवा भाऊंवर केलेल्या विश्वास व प्रेमाची दखल जरूर मी घेणार आणि आपला ऋणी राहील असे सांगितले.
जिल्हाध्यक्ष इंजी. सुभाष कासनगोटटूवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, राखी संकलन हा उपक्रम केवळ एक सोपस्कार नसून समाजातील आत्मीयता, विश्वास आणि बंधुभावाचे जिवंत प्रतीक आहे. भगिनींनी दाखवलेले प्रेम आणि निष्ठा या राख्यांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचले असून, जनतेशी असलेल्या आत्मीय नात्याचा हा एक सुंदर प्रत्यय आहे.
कार्यकर्त्यांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यसंस्कृतीतील संघटितपणाचे आणि समाजाशी असलेल्या जिव्हाळ्याचे द्योतक असल्याचे स्पष्ट केले. रक्षाबंधनाच्या या निमित्ताने बांधली गेलेली राखी ही केवळ परंपरेचे प्रतीक नसून विश्वास, निष्ठा आणि भावनिक बंधाची साक्ष असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.