ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथे उपविभागीय कार्यालय स्थापन संदर्भात मागितला अहवाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना – तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथे उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालय स्थापने संदर्भात महसूल मंत्री, महाराष्ट्र शासन यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर व तहसीलदार कोरपना यांचे मार्फतीने कार्यालय स्थापने संदर्भात अहवाल मागवला आहे. त्यामुळे कार्यालय स्थापने संदर्भात हालचालींना वेग आला आहे.

तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील कोरपना हा महत्वपूर्ण तालुका म्हणून ओळखला जातो. दिवंगत नेते हरबाजी पाटील राजूरकर यांनी या तालुका निर्मितीसाठी मोठा लढा दिला होता.

कोरपना व जिवती तालुक्यांतील गावांसाठी असलेले केंद्रस्थान व राजुरा चे कोरपना, जिवती तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावापासून असलेले अधिकचे अंतर लक्षात घेता आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने व नागरिकांनी तालुक्यातील जनतेच्या सोयीच्या दृष्टीने उपविभागीय कार्यालयाची रास्त मागणी लक्षात घेता महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले होते.

त्यावर त्यांनी सकारात्मक पाउले उचलत कार्यालय स्थापनेसाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत अहवाल मागविला आहे. लवकरच हा अहवाल पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांची उपविभागीय कार्यालयाची मागणी फलश्रुत होण्याची चिन्हे आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये