धारदार तलवार घेऊन युवकाची दहशत
दहशत पसरविणाऱ्या युवकास भद्रावती पोलिसांनी केली अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील राहुल नगर पंचशील वार्ड भद्रावती येथे राहणारा युवक धारदार तलवार बाळगून दहशत पसरवीत असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्या आधारे या युवकाला दिनांक २१ रोज गुरुवारला तलवारी सह ताब्यात घेण्यात आले.
अमीत ओमप्रकाश टेंभुर्णे वय २५ वर्षे राहणार पंचशील वार्ड भद्रावती असे या युवकाचे नाव आहे ओमप्रकाश हा पिवळ्या रंगाच्या धातूची मूठ असणारी लोखंडी धारदार तरवार अंदाजे किंमत २ हजार ५०० रुपये आहे.
हि घेऊन परिसरात दहशत करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे त्याच्या घराची झडती घेतली असता तलवारीसह आरोपीला अटक करण्यात आली ही कारवाई ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात गजानन तूपकर, महेंद्र बेसरकर, अनुप अस्टूनकर , जगदीश झाडे, विश्वनाथ चौ चुधरी, गोपाल आनकुलवार यांनी केली