शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडूंची विभागावर निवड
तायकांन्दो खेळाडू जिल्ह्यात अव्वल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय तायकांन्दो स्पर्धा वरोरा येथील शेतकरी भावनात आज दिनांक २१/०८/२०२५ ला आयोजित करण्यात आल्या.
जिल्हास्तरीय तायकांन्दो स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी उत्तम कामगिरी पार पाडत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकाविले. त्यांनी तायकांन्दो खेळातील कौशल्य दाखवून जिल्ह्यात अव्वल येवून त्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचलित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील तायकांन्दोचे खेळाडू जिल्ह्यात अव्वल आले. यात १९ वर्षे वयोगटात शर्विल हटवार व शंभू गोवारदिपे हे दोन खेळाडू वेगवेगळ्या वजन गटात जिल्ह्यात अव्वल आले. तसेच १७ वर्ष वयोगटात कुमारी लक्ष्मी रंदये ही खेळाडू जिल्ह्यात अव्वल आली.
हे तीन्ही तायकांन्दोचे खेळाडू आता विभाग स्तरावर चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
तायकांन्दो क्रीडा प्रकारात जिल्ह्यात अव्वल येऊन विभाग स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंची भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, विश्वस्त माजी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ. सुधीर मोते, क्रीडा प्रशिक्षक प्रा. रमेश चव्हाण, डॉ. ज्ञानेश हटवार, किशोर ढोक, नरेज जांभूळकर, सतिश खेमस्कर, शुभम सोयाम, प्रवीण मत्ते,समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले, व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.