ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चरुर (धा) गावात श्रमदानातून ग्राम स्वच्छता अभियान
आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना व महेश केदार मित्र परिवाराचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील चरुर गावात आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचा वतीने श्रमदानातून ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात विरांगणा मुक्ताई क्रिडा मंडळ व ग्रामवासीय मोठ्या संख्येत सहभागी झाले. गावामध्ये ठिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या अभियानात संघटनेचे अध्यक्ष रोहित केदार, सचिव सौरभ दडमल, सदस्य सचिन क्षिरामे,साहिल नन्नावरे, सल्लागार अमोल दडमल इतर गावकरी समाजबांधव महेश केदार,राजु श्रीरामे, मंगेश केदार,मंडळींनी ग्रामस्वच्छता अभियानात सहकार्य केले. यावेळी उपस्थित सर्वानी श्रमदानान करण्याचा व गावाला स्वच्छ, सुंदर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.