जि. प. प्राथमिक शाळा विजासन येथे बाल संरक्षण कार्यशाळा संपन्न
हृदय संस्थेतर्फे ऍक्सेस टू जस्टीस प्रकल्पाच्या अंतर्गत बालकांच्या संरक्षणार्थ कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील विजासन वॉर्डातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजासन येथे रुदय संस्थेच्या वतीने ऍक्सेस टू जस्टीस प्रकल्पाच्या अंतर्गत बालकांच्या संरक्षणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रुदय संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रिया कांबळे यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह, बाल लैंगीक अत्याचार आणि सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श याबद्दल त्यांना प्रात्यक्षिक सांगितले तसेच बालमजुरी आणि बाल तस्करी या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी सौ. रश्मी भोयर (क्षेत्रीय अधिकारी, रुदय संस्था गडचिरोली) या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सौ. अनिता पेंदाम (मुख्याध्यापिका जि.प. उच्च प्राथमिक शाळा, विजासन) यांनी भूषविले.
तसेच तुलिकाताई रामटेके (उपाध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती विजासन) यांची सुद्धा उपस्थिती लाभली. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक वऱ्हाडे सर , कु.जीवणे मॅडम, कु. चांदेकर मॅडम, कु.डोंगरे मॅडम, सौ.चहांदे मॅडम, सौ. कोरडे मॅडम तसेच अंगणवाडी शिक्षिका खिरटकर मॅडम, गायकवाड मॅडम, मानकर मॅडम यांची सुद्धा उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान, बालविवाहासारख्या घटना आढळल्यास १०९८ चाईल्ड हेल्पलाईन या क्रमांकावर तत्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमच्या शेवटी उपस्थित सर्वांनी बालविवाह मुक्त भारताची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.