23 ऑगस्ट रोजी गुरुनानक कॉलेजमध्ये बौद्धिक संपदा हक्कांवरील राष्ट्रीय कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गुरुनानक सेवा समिती विरूर द्वारा संचालित गुरुनानक कॉलेज ऑफ सायन्स, बल्लारपूर येथील जीवरसायनशास्त्र विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बौद्धिक संपदा जनजागृती अभियानाअंतर्गत एक दिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट (RGNIIPM), नागपूर व भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.
ही कार्यशाळा “बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights), पेटंट्स व डिझाईन फाइलिंग” या विषयावर होणार असून तिचे आयोजन शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ते दुपारी १२ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी डॉ. कुमार राजू, सहाय्यक नियंत्रक (पेटंट्स व डिझाईन्स), RGNIIPM नागपूर हे संसाधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, संशोधकांना व शिक्षकांना पेटंट व डिझाईन फाइलिंगची प्रक्रिया तसेच बौद्धिक संपदा हक्कांचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती मिळणार आहे.
या कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ. बी. एम. बहीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, संयोजक प्रा. अर्पणा ए. दुर्गे आहेत व आयक्यूएसी समन्वयक डॉ. शोभा ए. गायकवाड आहेत.