ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“आमचा देवा भाऊं” रक्षाबंधन सोहळाला लाडक्या बहिणीचा उत्तम प्रतिसाद!

लाडक्या बहिणीचे प्रेम हे देवा भाऊंना राज्याची सेवा करण्याची ऊर्जा ठरणार - देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

गडचांदूर :- बहीण-भावाच्या प्रेमाचे नाते सदैव टिकून राहावे भावाला बहिणीची नेहमी साथ असावी या करिता रक्षाबंधन सनाला प्रत्येक महिला आपल्या भावाला राखी बांधत असते व बहीण भावाच्या दीर्घायुष्याची कामना करते भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसुन विस्तृत परीवार झाला आहे. या परिवारातील प्रत्येक व्यक्ती महिलेला लाडक्या बहिण माणतात. आणि या परिवारातील आम्हचा लाडका देवा भाऊ समजून त्यांना राजुरा विधानसभेतून पाच हजार राखी लाडक्या बहिणीने पाठविल्या आहे.एवढेच नव्हेतर आपल्या हाकेला धावून येणारा लाडका देवराव दादा यांना सुद्दा प्रत्येक्ष राखी बांधण्या करिता गडचांदूर भाजपा महिला आघाडीच्या वतीने गडचांदूर येथे “आमचा देवा भाऊ रक्षाबंधन सोहळा” म्हणून आयोजित केला. या कार्यक्रमात हजारो महिलांनी स्वईछयेने उपस्थित दर्शवून दादांना सुद्दा दीर्घ आयुष्याची कामना केली. व शकडो महिलानी राखी बांधली.

        तेव्हा आमदार देवराव दादांनी त्या लाडक्या बहिणींना सुद्दा खुप खुप शुभेच्छा दिल्या व एवढा मोठा लाडक्या बहिणीच्या प्रेमामुळे निश्चितच देवा भाऊंना या राज्याची सेवा करण्याची ऊर्जा ठरणार आहे.असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

           पुढे बोलताना आमदार भोंगळे म्हणाले की, याठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक बहिणींनी मला राखी बांधून एकप्रकारे स्नेह, विश्वास आणि त्यांच्या सेवेची जबाबदारीच माझ्या हाती दिली आहे. याठिकाणाहून लाडक्या बहिणींनी राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनाही राखी पाठविली. आपली ही राखी आता केवळ आमच्या हातावर राहणार नसून कायम आमच्या मनात असणार आहे. लाडक्या बहिणींच्या सुखदुःखात तुमच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे. लाडक्या बहिणींचे सक्षमीकरण, शिक्षण, स्वयंरोजगार आणि सुरक्षीतता पुरविण्यासाठी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपले महायुती सरकार कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला मंचावर प्रमुख म्हणून आमदार देवराव भोंगळे, त्यांच्या धरमपत्नी सौ. अर्चना भोंगळे, जिल्हा महामंत्री विवेकजी बोढे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, शहराध्यक्ष,अरविंद डोहे, महिला मोर्चाच्या महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, शहराध्यक्षा शितल धोटे, उमाताई कंठाळे, नमिता बिश्वास, अपर्णा उपलेंचवार, सपना सेलोकर, अरुणा बेतावार, स्मिता चिताडे, रंजना मडावी, हरीश घोरे, शंकर आपूरकर, रामसेवक मोरे, सतीश बेतावार, महादेव एकरे, शिवाजी सेलोकर, महेश घरोटे, अरविंद कोरे, महेश शर्मा, विश्वम्भर झाम, विनोद इंगळे रमेश चुदरी, प्रवीण सातपाडे,गणेश आदे, रसूल ठेकेदार, गोलू ईखारे, सचिन माळी, वासुदेव आसुटकर, दिवाकर धनवलकर, जयंता भोंगळे, विठ्ठल धांडे, सत्यदेव शर्मा, विनोद कडू, महालिंग कंठाळे, कैलास कंठाळे, विजय मेंढी, गणेश आदे, रमेश जिवतोडे, राजू बट्टलवार, विनोद बट्टलवार, राजू गेडाम, दिवाकर आगलावे, रोहन काकडे, तुषार देवकर, विक्की उरकुडे, विक्की घोरे, धवल घोरे, वैभव पोटे, राहुल चुरे, अमर वाडीकर, जगन कापसे, विलास केवट, धर्मा वाघमारे, सुरेश इटनकर, राजू सिडाम, बंडू रासेकर, रामकिसन ऊलमाले, अनिल चवले, रवींद्र मनगेलवार, पुरुषोतम सोनुले, राकेश अरोरा, रामेश्वर सिंग, समाधान पवार, धर्मेंद्र सिंग, भागवत साहेब विजय नक्षीने, संजय पोगुलवार, चंद्रकांत सोमवंशी, महेश वाघमारे, संगीता आत्राम, शालिका बेले, जया लोहे, आशा धनवलकर, पौर्णिमा आवळे, त्रिवेना जगताप, किरण उईके, वृन्दा चवले, शारदा पुसटे, विजया कंटाळे,साक्षी चौधरी, नैना चौधरी, भारती गोखरे प्रीती सातपाडे, पूजा वाघमारे, शिल्पा भगत,सुजाता डोंगरे, वर्षा वाघमारे, सपना भोंगळे, पायल येलमुले, जया येरेकर, अनु शर्मा आदिंसह लाडक्या बहिणींची मोठी उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये