वरोरा तालुका फोटोग्राफर तर्फे पदयात्रा, बाईक रॅली, वृक्षारोपण व सत्कार
जागतिक छायाचित्र दिन विशेष निमित्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
जागतिक छायाचित्र दिनानिमित्य वरोरा तालुका फोटोग्राफर तर्फे पदयात्रा, बाईक रॅली, वृक्षारोपण व सत्कार चा कार्यक्रम १९ ऑगस्ट ला पार पडला.
या कार्यक्रमाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथुन – म. ज्योतिबा फुले चौक – वीर सावरकर चौक – म. गांधी चौक- नेहरू चौक पर्यंत पदयात्रा काढुन नंतर भारत माताकी जय , वंदे मातरम, छायाचित्र दिन चिरा्यू हो च्या घोषणात बाईक रॅली काढण्यात आली. योगेश डाहुले शाहिद चौक-छ. शिवाजी महाराज चौक – या मार्गे आनंदवनला वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी युवा छायाचित्रकार रामकृष्ण गौरकार यांची विद्युत सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार प्रमुख पाहुणे TDUC फोटोग्राफर चंद्रपूरचे अध्यक्ष गणेश साळवे, प्रीतम खोब्रागडे, विजय कावटकर, रमेश तांडी यांच्या हस्ते करण्यात आला. व छायाचित्र दिनाविशेष मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजक विशाल ढवस, संचालक शिरीष उगे यांनी केले. तर आभार सागर साळवे, रामदास तुराणकर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वरोरा तालुक्यातील फोटोग्राफर शिरीष उगे, सागर साळवे, रामदास तुराणकर, विशाल कुत्तरमारे, गिरीश टोंगे, राकेश नवघरे, योगेश अवघाण, प्रशांत ताजने, संतोष फुटाणे, वैभव पोटे, खुशाल हरणे, विनोद मसाडे, विजय आत्राम, निखिल शेमभाळकर, तुषार घानोडे, प्रशील बागेसर, अक्षय ठाकूर, मुनेश्वर राऊत, प्रज्वल एकरे, विजय निकु्रे, मयुर ढोले, मुरलीधर गुल्हाने रुपेश उगे, पांडुरंग मुसळे, प्रीतलं दाते, सतीश विरुटकर, संकेत दानव, अक्षय पेंदाम, राहुल मेश्राम, राहुल मुजोरिया, भारत सिन्हा, अंशुल मोहितकर, हरीश वाटे, हर्षल बाकडे, रामकृष्ण गौरकर, आदेश भुते, राजू ननावरे, अक्षय अंड्रस्कर, प्रफुल वाढई मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.