गडचांदूर काँग्रेस कडून सुमितला मोलाची आर्थिक मदत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील रहिवासी श्री.आतिश ठाकरे यांचा आठव्या वर्गात शिकणारा मुलगा सुमित याला काही महिन्यांपूर्वी एका दुर्धर आजाराने ग्रासले,त्याच्यावर उपचार करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता होती,घरची परिस्थिती अतिशय खालावलेली आणि बिकट असतानाही त्याच्या उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न त्याचे वडील हे करत आहेत पण प्रश्न पैशाचा असल्याने मोठी रक्कम खर्च करण्यात त्यांना खूप अडचणी येत आहेत, ही गोष्ट जेव्हा शहर काँग्रेसचे लक्षात आली तेव्हा श्री रऊफ खान वजीर खान, माजी उपसभापती कोरपणा यांच्याकडून 11000 रुपये व श्री सचिन भोयर माजी उपनगराध्यक्ष गडचांदूर यांच्याकडून 11000 रुपये असे एकूण 22 हजार रुपयांची मदत सुमितला करण्यात आली यावेळी श्री रऊफ खान वजीर खान माजी उपसभापती कोरपना, माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष महाडोळे,राजुरा विधानसभा युवक काँग्रेस महासचिव विवेक येरणे, संजय भाऊएकरे, अहमद भाई, संजय चिकटे, सुरज गोंडे, प्रणित निवलकर, सुरेंद्र खामनकर, सुरज गोंडे, भारती मडावी, कुसुमबाई शेंद्रे, सुमितचे आई,वडील उपस्थित होते. काँग्रेस नेहमी समाजाभिमुख काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. असे सचिन भोयर यांनी सांगितले.