मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा जनावर नगरपरिषदेतं कोंडणार.!
आठ दिवसात कारवाईचा करा शहर भाजपचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
शहरांमधील रस्त्यांवरून मोकाट बसणारी व फिरणारी जनावरे नागरिकांसाठी एक गंभीर समस्या बनली आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि पादचारी, अबाल वृद्धाना नाहक त्रास सहन करावं लागत आहे.सदर समस्सेवर नगरपरिषद प्रशासनाने आठ दिवसात उपाय योजना कराव्यात अन्यथा शहर भाजपा तर्फे मोकाट जनावरांना रेडियम बेल्ट लावून नगरपरिषद कार्यालयात कोंडन्यात येईल असा इशारा शहर भाजपा तर्फे प्रेस नोट द्वारे देण्यात आलेला आहे.
मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेऊन त्यांची योग्य व्यवस्था करावी, शहरातील कोंडवाडे नूतनीकरण करून कंत्राट देण्यात यावे,जनावरांना रेडियम बेल्ट लावण्यात यावे, मोकाट जनावरांच्या मालकांना सूचनापत्र द्यावे अशा आशयाच्या प्रशासनाला वारंवार सूचना व निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाने,ब्रम्हपुरी शहरांमध्ये मोकाट जनावरांची समस्या जैसे थे राहत, समस्सेने गंभीर स्वरूप धारण केल्याचे दिसून येत आहे.
. जनावरे रस्त्यावर बसून राहतात किंवा अचानक रस्त्यात आडवी येतात, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत होते आणि अपघातांचा धोका वाढत आहे.सदर समस्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील बऱ्याच नागरिकांना आपला जीव गमवावं लागला तर कित्तेकांना कायमच अपंगत्व आलेलं आहे.
यावर उपाययोजना म्हणून शहर भाजप अध्यक्ष श्री सुयोगकुमार बाळबुधे यांनी प्रशासनाला मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत नगरपरिषद प्रशासनाला इशारा देतं पुढील आठ दिवसात मोकाट जनावरांचा कायमचा बंदोबस्त करावा अन्यथा मोकाट जनावरांना रेडियम बेल्ट लावून नगरपरिषद कार्यालयात कोंडणार असा सज्जड इशारा दिलेला आहे.