गडचांदूर येथे प्रीपेड मीटर बदलविण्यासाठी काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जुने मीटर काढून प्रीपेड नवीन मीटर लावण्यात आलेले आहे व आधीच्या आणि आताच्या बिलामध्ये जर तफावत बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये नवीन प्रीपेड मीटरचे बिल हे चार चार पटीने जास्त येत असून त्यामध्ये मोल मजुरी करणारे गरीब वर्ग यांचे अतोनात नुकसान होत असून सरळपणे गोरगरीब लोकांची लूट महावितरण कंपनी मार्फत सुरू आहे गेल्या वर्षभरापासून गरीब मोलमजुरी करणारे गडचांदूर ची जनता आलेले बिल प्रामाणिकपणे भारत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करत आहे.
बिलासंदर्भात लोकांनी जेव्हा तक्रार काँग्रेस च्या कार्यकर्त्यांकडे केली त्यावेळेस काँग्रेसचे कार्यकर्ते त्या सर्व ग्राहकांना घेऊनआज कार्यालयावर धडकले आणि तेथील अधिकाऱ्यांना होत असलेल्या लुटमार बद्दल जाब विचारला, अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली आम्ही वाढलेले बिल चौकशी करून कमी करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले उपविभागीय अभियंता उपस्थित नसले तरी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून लवकरात लवकर सर्व ग्राहकांचे ज्यांचे बिल अतोनात आलेले आहे या सर्वांचे बिल आम्ही कमी करू असे आश्वासन दिले. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जे जुने मीटर काढण्यात आलेले आहे तेच मीटर पुन्हा लावण्यात यावे अशी मागणी केली.
जर का बिलामध्ये दुरुस्ती केली नाही आणि नवीन प्रीपेड मीटर काढून जुने मीटर न लावल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा सुद्धा यावेळी महावितरण कार्यालयाला दिला काँग्रेसच्या शिष्टमंडळात माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष महाडोळे राजुरा विधानसभा युवक काँग्रेस महासचिव विवेक येरणे, संजय भाऊएकरे, अहमद भाई, संजय चिकटे, सुरज गोंडे, प्रणित निवलकर, सुरेंद्र खामनकर, सुरज गोंडे, भारती मडावी, तथा महिला व पुरुष ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.