ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बुद्धिबळ स्पर्धेत कन्या विद्यालयाचे यश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
बल्लारपूर :_ स्थानिक क्रीडा संकुल येथे २० ऑगस्ट रोजी आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत मोहसीन भाई जवेरी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले.
अंडर १९ गटात कुमारी पूनम संजय चव्हाण हिने द्वितीय क्रमांक, कुमारी सलोनी बालाप्रसाद वर्मा हिने चौथा क्रमांक, तर कुमारी समीक्षा उराडे हिने पाचवा क्रमांक मिळवला. अंडर १७ गटात कुमारी गीतांजली अशोक कुमार भारती हिने पाचवा क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल मुख्याध्यापिका आसमा खलीदी, शारीरिक शिक्षिका शबाना मेहमूद तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.