ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यासाठी नवोदय परिक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षासाठी बसणाऱ्या जिल्हा परिषद शाळा,खाजगी अनुदानित शाळा आणि इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळेतील हिंदी, इंग्रजी व मराठी माध्यमांच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय तालुकास्तरीय नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता लोकमान्य विद्यालय भद्रावती येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचाचे उद्घाटन प्रमुख अतिथी आम्रपाली बागेसर, पत्रकार प्रा.सचिन सरपटवार व प्रा. राकेश आवारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचा अभ्यास कसा करावा, अभ्यासक्रम ओळख ,प्रश्नपत्रिका स्वरूप आणि गणितातील सोप्या पद्धती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिरात नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या जिल्हा परिषद शाळा,खाजगी अनुदानित शाळा व इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळांमधील हिंदी, मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनि सहभागी व्हावे, असे आवाहन जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये