ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे शिवसेना उबाठाचा राज्य शासनाच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      दिलेल्या वचनानुसार लाडक्या बहिणींना २१०० रुपये महिना देण्यात यावा, जाहीरनाम्यात दिल्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना पूर्णतः कर्जमुक्ती देण्यात यावी, रमी खेळणाऱ्या मंत्र्याला पदोन्नती देण्यात आली, त्यांना त्या पदावरून हटविण्यात यावे, औद्योगिक कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशा अनेक मागण्यांना घेऊन भद्रावती शिवसेना उबाटातर्फे स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून राज्य शासनाच्या विरोधात दिनांक 20 रोज बुधवारला जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर आंबेडकर चौकातून मोर्चा निघाल्यानंतर तो शहरातील मुख्य रस्त्याने निघून बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारा जवळ आल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी राज्य शासनाच्या कार्यप्रणालीच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने आणि शिवसेना कामगार संघटनेचे माजी जिल्हाप्रमुख सुयोग भोयर यांनी उपस्थितांना संबोधित केले. भास्कर ताजने आणि सुयोग भोयर यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात शिवसेना ऊबाठाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तथा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये