ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती शहरात नशामुक्ती अभियान अंतर्गत भव्य रॅली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नशामुक्ती अभियानांतर्गत १९ ऑगस्ट मंगळवारी रोजी सकाळी ११:३० ते ११:३० च्या दरम्यान जिवती शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलीस स्टेशन जिवती अंतर्गत बालाजी हायस्कूल, विदर्भ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आणि लालीबाई हायस्कूल यांच्या सहकार्याने ही रॅली काढण्यात आली.

           सदर रॅलीचा मार्ग पोलीस स्टेशन जिवती येथून सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वार्ड क्रमांक सहाची गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मरेवाड चौक, कुंभेझरी चौक आणि पुन्हा विर बाबुराव शेडमाके चौक येथे समारोप झाला. या रॅलीदरम्यान बालाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक नभिलास भगत आणि पोलीस स्टेशन जिवतीचे ठाणेदार प्रविण जाधव यांनी नशामुक्तीच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले.रॅलीत पोलीस स्टेशन जिवतीचे ३ अधिकारी, १० पोलीस कर्मचारी, बालाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक नभीलास भगत,विदर्भ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे संजय मुंडे यांच्यासह इतर शिक्षक, लालीबाई हायस्कूलचे शिक्षकवर्ग यांच्यासह एकूण १५ शिक्षक आणि अंदाजे ३०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या रॅलीने जिवती शहरात नशामुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये