ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वणी (बु ) येथे व्यसनमुक्ती अभियानांतर्गत जनजागृती!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- व्यसनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. व्यसनाचे प्रमाण शाळा,कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले आहे. म्हणून तालुक्यातील पोलीस कॅम्प वणी (बु) व संगम विद्यालय वणी ( बु ) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच व्यसनमुक्ती अभियान राबण्यात आले.

यावेळी गावातील अहिल्यादेवी होळकर चौक येथून रॅली काढून व्यसनमुक्तीचे नारे देण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाला पोलीस कॅम्पचे ठाणेदार वरठी व अन्य पोलीस शिपाई तसेच संगम विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. बी. फड यांनी मुलांशी व नागरिकांशी संवाद साधून व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले.

यावेळी माजी सरपंच तिरुपती कुंडगीर, समाजसेविका अनिता कुंडगीर, चांदबी शेख व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये