पोलीस भरती व सैन्य भरतीसाठी सराव करणाऱ्या युवक व युवतींना मैदान उपलब्ध करून द्या
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांची निवेदना द्वारे उपविभागीय अधिकारी वरोरा यांना केली मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नितीन भाऊ मते यांचे नेतृत्वात व आशिष ठेंगणे, मनीष बुच्चे यांचे पुढाकारातून निवेदन देण्यात आले. भद्रावती शहरातील असंख्य युवक युवती पोलीस भरती व सैन्य भरती यासाठी मैदानी सराव करण्यासाठी आज पर्यंत ओएफ चांदा येथील ग्राउंडवर सराव करीत होते.
पण ऑडर्नन्स फॅक्टरी प्रशासनाने या युवकांना मैदानावर सराव करण्यास मज्जाव केला त्यामुळे सर्व युवक युती हे भद्रावती येथील पोलीस स्टेशनच्या मागील क्रिडा संकूल मैदानावर सराव करण्याचा प्रयत्न करू लागले पण हे मैदान अतिशय खराब असल्यामुळे सराव करण्यास अनेक अडचणी येत आहेत या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न होत असताना सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे ही बाब नितीन मते यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी वरोरा यांना भेटून एक निवेदन सादर केले व त्यांना विनंती केली की तात्काळ या युवक युवतींना आपण ओ एफ चांदा प्रशासनाशी बोलून तेथील मैदानावर सराव करण्याची परवानगी मिळवून द्यावी व लगेच भद्रावती येथील मैदानाची तात्काळ दुरुस्ती करून असंख्य युवक युवतींना सराव करण्यास एक उच्च दर्जाचे मैदान निर्माण करून द्यावे.
यावेळी मैदानावर सराव करणारे श्री गौरव घोरूडे, चेतन घोरपडे, करण उपरे, दिनेश चिंचोरकर, मनीष बुच्चे, प्रथम बोरकुटे, अक्षय आस्कर, प्रथम गेडाम, अर्पित कुमरे, ऋषी चुटे, आकाश क्षिरसागर, जयेन्द्र चेंदे, सुमित बारतीने, डेव्हीड साव, शादाब शेख, शुभम सिलार व अनेक युवक – युवती उपस्थित होते.