ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘साहेब’ आमच्या गावची दारू बंद करा हो!

गावकऱ्यांचे जिवतीच्या ठाणेदाराला निवेदन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती तालुक्यातील शेणगाव येथे अवैध दारू विक्री जोरात सुरू असून या दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे.येथील महिला गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतात. मात्र गावातील अवैध दारू विक्रेते या महिलांना शिवीगाळ करीत मारहाण करण्याच्या धमक्या देत असतात त्यामुळे गावातील अवैध दारू विक्री बंद करून महिलांना संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन गावातील महिलांनी जिवती पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना दिले आहे.

      शेणगाव येथे अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून या अवैध दारू विक्रीमुळे गावातील शांतता भंग होऊन गावात भांडण तंट्यांचे प्रमाण वाढले आहे. अवैध दारू विक्रीचा परिणाम गावातील युवा पिढीवर होत असून युवा पिढी दारूच्या आहारी जात आहे.येथील महिला या अवैध दारू विक्रीच्या विरोधात नेहमी आवाज उठवून ही अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात.

       मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता गावात अवैध दारू विक्री जोरात सुरूच आहे. ही सर्व बाब लक्षात घेऊन गावातील अवैध दारू विक्रीवर आळा घालून गावातील महिलांना अवैध दारू विक्रेत्यांपासून संरक्षण द्यावे अशी मागणी ठाणेदारांना दिलेल्या या निवेदनातून गावातील महिलांनी केली आहे.

यावेळी निवेदन देताना उपसरपंच नरेश हामने, तमुस अध्यक्ष प्रल्हाद राठोड,माजी तमुस अध्यक्ष महादेव डोईफोडे,पोलिस पाटील रमाकांत माने, ग्रामपंचायत सदस्य नंदाताई मुसने, अजय तीरणकर, पत्रकार शब्बीर जागीरदार, हकानी शेख,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल कांबळे,रफिक पठाण, लक्ष्मण मुंडे,विठ्ठल केजगीर,माधव शेबळे, बालाजी वाघमारे,माधव कांबळे,चंद्रकांत जाधव,अर्चना खंदाडे,शेषाबाई वंगवाड,निलाबाई जाधव,महानंदा कदम,चंद्रकला चोले,केवळबाई गिरमे,संगीता जाधव आदीसह गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये