ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निलेश ताजने यांना लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार

आज लंडन मध्ये होणार पुरस्काराचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- गडचांदुरचे भूमिपुत्र आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेले युवा उद्योजक निलेश ताजने यांना प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आज लंडन येथे आयोजित लोकमत पुरस्कृत “ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन” या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

श्रीतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले ताजने गेल्या सहा वर्षांपासून स्वप्नपूर्ती फूड्स लिमिटेडच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. समाजसेवेच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी शासनाच्या कल्याणकारी योजना निःशुल्कपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे.या दिमाखदार सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.

ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची वाटचाल, जागतिक व्यापारातील बदल, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.या समारंभात महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असून, निलेश ताजने यांचा हा सन्मान गडचांदुर आणि विदर्भासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये