ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुसळधार पावसाने पोस्ट ऑफिस जलमय 

ग्राहकांना पाण्यातून जावे लागत आहे पोस्टात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथे सुरू असलेल्या सततधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील पोस्ट ऑफिस चा परिसर जलमय झाल्याने आज ग्राहकांना पाण्यातून पोस्टात जावे लागले, जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागला, पोस्ट ऑफिस परिसरात काँक्रिट चे काम करून पाणी साचणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी केली जात आहे, पोस्ट ऑफिस जवळूनच सॉ मिल कडे गेलेल्या रस्त्याचे काम गेल्या वर्षी अतिशय निकृष्ट दर्जाचे केले असल्याने पूर्ण उखडला असून जागोजागी खड्डे पडले आहेत त्यात पावसाचे पाणी साचले असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, सदर रस्त्याचे काम नव्याने करण्यात यावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

पोस्ट ऑफिस परिसरात लवकरच काँक्रीटीकरण करणार आहेत, त्यामुळे पाणी साचणार नाही, तसेच पोस्ट ऑफिस जवळूनच गेलेल्या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केल्याने बिल रोखले आहे, लवकरच या रस्त्याचे काम नव्याने केले जाईल

     अरुण मोकळ, मुख्याधिकारी, नगर परिषद देऊळगाव राजा

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये