जुगार अड्ड्यावर पाथरी पोलिसांच्या छापा
११ जण अटकेत ; २ लाख २० हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या निमगाव परिसरात अवैद्य जुगार अड्ड्यावर पाथरी पोलिसांनी धाड टाकून एकूण 2,20,770/ रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई शनिवार रोजी निमगाव परिसरात अवैध्य जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पाथरी पोलीस स्टेशन येथील ठाणेदार नितेश डोर्लीकर यांनी आपली चमू घेऊन जुगार अड्ड्यावर धाड टाकली यात 1)अतुल देवराव भांडेकर. 2) लोमेश लालाजी राजगडे. 3) ज्ञानेश्वर सोमाजी साहारे. 4) दुर्योधन रामदास मुद्दावार.5)कृणाल कालिदास भडके. 6) सागर मदन ताडुलवार.7) गुरुदास गजानन ढोले.8) नरेंद्र मोडुजी बोरुले. 9) अरविंद बकाराम चिमूरकर.10) देवनाथ तीमाजी झाडे.11) मुखरू सुखरू नागापुरे या अकरा व्यक्तींना अवैध जुगाड खेळताना अटक करण्यात आली असता त्यांच्याकडून 75770/रोख रक्कम व चार दुचाकी अ. की. 145000/असा एकूण 220770/रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर कलम 12 (अ ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे उपविभागीय पोलीस अधीक्षक सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितेश डोर्लीकर,पो. ह. खेलेश कोरे, गिरीधर आंबोरकर,मेघशाम गायकवाड, अमित मस्के, किरण भगत, श्रीराम बोदलकर, विकेश वनस्कर यांनी केली.