सावली येथे 19 ला भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन
एक लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक ; अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
साथ फाउंडेशन व रोहितभाऊ बोम्मावार मित्र परिवाराचे आयोजन
सावली शहरात प्रथमच साथ फाउंडेशन व रोहितभाऊ बोम्मावार मित्रपरिवार सावली च्या वतीने गोकुळाष्टमीचे औचित्य साधून दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेकरिता प्रथम पुरस्कार 1 लाख रुपये आमदार बंटी भाऊ भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्र यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार 51 हजार रुपये चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे संचालक रोहितभाऊ बोम्मावार यांच्याकडून देण्यात येणार आहे. दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोज मंगळवार ला सायंकाळी चार वाजेपासून सावलीतील पंचायत समिती समोरील पटांगणावर या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेकरिता प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हेही उपस्थित राहणार आहे. तर मुबंई येथील प्रसिद्ध गायिका इशरत जहाँ यांची बहारदार गाणी सादर होणार आहे.तर प्रसिद्ध लावण्यावती आस्था वाणढरे यांची लावणी सादर होणार आहे.या दहीहंडी स्पर्धेचे उद्घाटन चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीकुमार भांगडीया यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे राहणार आहे.
तर प्रमुख उपस्थिती मध्ये अनेक गणमान्य उपस्थित राहणार आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोफत प्रवेश आहे.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन साथ फाउंडेशन व रोहितभाऊ बोम्मावार मित्रपरिवार च्या वतीने करण्यात आलेले आहे.