गडचांदूर शहरातील सिमेंट कंपनीचा कचरा डेपो बंद करा
युवक काँग्रेसची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
खासदार प्रतिभा ताई धानोरकर यांना माणिकगड सिमेंट (अल्ट्राटेक) गडचांदूर येथे मानवी वस्तीला लागून नव्याने उभारलेला कचरा डेपो डंपिंग यार्ड तात्काळ
हटविण्याबाबत कोरपना तालुका युवक काँग्रेसचे महासचिव विवेक नामदेवराव येरणे यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे
औदयोगीक नगरी गडचांदूर स्थित माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक सिमेंट) ने शहराला लागून असलेल्या मानवी वस्ती ला लागून कचरा डेपो डम्पिंग यार्ड नव्याने निर्माण केलाला आहे. शहराच्या मधोमध असलेया थुटरा रोड वर लोकवस्तीला लागून सदर कचरा डेपो डम्पिंग यार्ड स्थित असून त्याच्या घाण वासाने (दुर्गंधीने) संपूर्ण गडचांदूर नगरवासी त्रस्त झालेले आहेत.
सदर कचरा डेपो डम्पिंग यार्ड निर्माण करण्याची कोणतीही परवानगी ही कंपनी ने नगर परिषद तर्फे घेतलेली नाही. सोबतच तत्कालीन ग्रामपंचायत ने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रात ही असल्या कोणत्याही कचरा डेपो निर्मितीचा उल्लेख नाही. सदर कचरा डेपो मुळे संपूर्ण नगर वासियांना तीव्र दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून लोकांचे जगणे मुश्किल झालेले आहे.
काही दिवसांपूर्वी नगर वासीय जनतेने या बाबत कंपनी परिसरात आंदोलन केले असता माणिकगड सिमेंट तर्फे कचरा डेपो बंद करून नव्याने दुर्गंधीयुक्त कचरा बोलाविण्याचे बंद करण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते परंतु आता ही दुर्गंधीयुक्त गाड्या मध्ये कचरा आणणे सुरूच असून कंपनी ला गडचांदूर वासीय जनतेच्या आरोग्याची कोणतीही काळजी नसल्याचे दिसून येत आहे.
लोकांच्या जीवितास हानी करणाऱ्या व नियमानुसार अवैध असणारा सदर कचरा डेपो डम्पिंग यार्ड हा तात्काळ हटविण्याबाबत माणिकगड सिमेंट कंपनीवर(अल्ट्रा टेक सिमेंट गडचांदूर) कारवाई करण्यात यावी असे निवेदनातून कोरपना तालुका युवक काँग्रेसचे महासचिव विवेक नामदेवराव येरणे यांनी मागणी केलेली आहे