ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लखमापूर येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची ७५० वी जयंती उत्साहात साजरी

पालखी सोहळ्याने भक्तिमय वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० वी जयंतीनिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर येथे भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हालं असून, एकात्मतेचा आणि सांस्कृतिक वारशाचा अनोखा अनुभव गावकऱ्यांना मिळाला.

या कार्यक्रमाचे नेतृत्व शाळेचे मुख्याध्यापक श्री. क्षीरसागर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गावचे सरपंच श्री. अरुण भाऊ जुमनाके आणि शाळा व्य. समितीचे अध्यक्ष श्री. मोरेश्वर भाऊ जोगी यांनी पालखीमध्ये सहभागी होऊन प्रोत्साहन दिले

– शाळेपासून गावाच्या मुख्य रस्त्यांवरून पालखीचे वाजतगाजत प्रस्थान

– विद्यार्थ्यांनी माऊलीच्या अभंगांवर आधारित सांस्कृतिक सादरीकरण

– गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत

– “ज्ञानोबा-तुकाराम” च्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय

या सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती सादर केली. त्यांच्या ज्ञानेश्वरीतील विचार, भक्ती आणि समाजप्रबोधनाचे कार्य यावर प्रकाश टाकण्यात आला. शिक्षकांनीही संत परंपरेचा महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

माऊलीच्या गजराने संपूर्ण गाव दुमदुमले होते. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने वातावरणात भक्तीची ऊर्जा संचारली होती. गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ, युवक मंडळ यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. क्षीरसागर सर यांनी सर्व सहभागींचे आभार मानले आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये