Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार प्रतिभा धानोरकर व नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट

चांदा ब्लास्ट :

भद्रावती :-

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर तथा भद्रावती पालिकेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र त्यांच्या या भेटीमुळे भद्रावती वरोरा विधानसभा संपूर्ण जिल्ह्यात विविध राजकीय चर्चांना उत आला असून संपूर्ण जिल्ह्यात याविषयी अनेक तर्क वितर्कांना सुरुवात झाली आहे. मात्र ही भेट ही केवळ कौटुंबिक तथा सदिच्छा भेट असल्याचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी स्पष्ट केले असून या भेटीदरम्यान कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पालिका कामकाजाच्या निमित्ताने नगराध्यक्ष अनिल धानोरकर हे मुंबईला गेले असता त्यांनी आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो  समाजमाध्यात  व्हायरल होताच क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. या भेटीला अनेकांनी राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न केला. तर याविषयी अनेक राजकीय अंदाज बांधण्यात आले. मात्र नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी ही भेट राजकीयदृष्टीने प्रेरित नसून ही केवळ सदिच्छा भेट होती हे स्पष्ट करून या भेटीच्या माध्यमातून या विषयावर पडदा टाकला. या भेटीचा कुणीही राजकीय अर्थ लावू नये असे आवाहन केले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये