ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालयच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर तथा विज्ञान महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पर्यावरण सेवा योजना विभागातर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शैलेंद्र देव, महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयचे प्राचार्य साईनाथ मेश्राम उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे,उपमुख्याध्यापक विजय डाहुले, तथा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.