महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय उजळणी वर्ग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्समध्ये डॉ. एस. आर. रंगनाथन (भारतीय ग्रंथालयाचे जनक) यांची १३३ व्या जयंती निमित्त दिनांक १२ आगस्ट २०२५ रोज मंगलवारला ग्रंथालय उजळणी वर्गाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. मनोहर बांदरे यांनी केले.
मानवी जीवनात ग्रंथालयाचे महत्व स्पष्ट करून सांगितले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात जाऊन जास्तीत जास्त साहित्य स्रोत वापरून आपले ज्ञान वृद्धिंगत करावे हा ग्रंथालयाचा मुख्य उद्देश असतो. ग्रंथालयात बीटी कार्ड, issue -return प्रोसेस, बुक बँक, बुक डेपोषित, प्रिंट व इ-रिसोर्सेस इत्यादीसंदर्भात माहिती देण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा तसेच इतर वाचनीय साहित्याचा कसा वापर करावा याची इत्यंभूत माहिती प्रस्तुत कार्यक्रमाद्वारे सांगण्यात आली.
कार्यक्रमाचे दुसरे वक्ते प्रा. पवन चटारे म्हणाले कि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत टिकून राहण्यासाठी अवांतर वाचण्याची गरज आहे. आपल्या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेकरिता जी के ची पुस्तके आपण वापरावीत जेणेकरून वेगवेगळ्या स्पर्धेकरिता आपण तयार होऊ शकतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. शैलेंद्र देव होते. वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे आपण विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी, असे ते आपल्या वक्तव्यात म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. संदीप घोडिले यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अजयकुमार शर्मा यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ. अनिस अ. खान, प्रा. रामकृष्ण वाय. पटले, प्रा. चेतन द. वैद्य, प्रा. अक्रम शेख, प्रा. निखिल गिरसावले व श्री. बबन पोटे तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.