वर्ग मित्रांनी केला संजय पाटील यांचा सपत्नीक सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा हायस्कूल येथील सन १९८२/८३ च्या बॅचेचे वर्ग मित्रांनी एकत्र येत दिनांक ११ ऑगस्ट रोजी सौ कविता अनिल बाहेती यांचे निवासस्थानी या वर्गमित्र ग्रुप मधील संजय पाटील यांच्या धर्मपत्नी सविता संजय पाटील यांची भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून बुलढाणा जिल्हा महिला मोर्चाचे अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
देऊळगाव राजा शहर वासियानसाठी हा फार मोठा बहुमान असून राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपा कडून या ठिकाणच्या महिलेला त्यांनी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे जिल्हास्तरीय पदावर त्यांची नियुक्ती झाल्याने १९८२/८३च्या वर्ग मित्रांनी परिवारासह एकत्र येत दिनांक ११ ऑगस्ट रोजी संजय पाटील व सविता पाटील या दांपत्याचा एकत्रित सन्मान केला यावेळी या परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात महिलांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी संपूर्ण बुलढाणा जिल्हा पिंजून काढण्यात येणार असल्याचे यावेळी सविता पाटील यांनी सांगितले