सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस’ उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित वडगाव येथील सोमय्या इन्स्टिट्यूट येथे भारतीय ग्रंथालय व माहिती शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. पद्मनाभ गाडगे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “जास्तीत जास्त वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते आणि विविध विषयांवर प्रभुत्व मिळवण्यास मदत होते. वाचनातून मिळणारे ज्ञान आपल्या उज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते.”
कार्यक्रमात पुढे बोलताना संस्थेचे उपप्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी दररोज पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. पुस्तकी ज्ञान हे संपूर्ण आणि विश्वासार्ह असते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेटवरील माहितीचा वापर करताना आपण त्याची सत्यता तपासत नाही. त्यामुळे पुस्तकांचे वाचन अधिक महत्त्वाचे आहे.” तसेच ग्रंथाल्याबद्दल माहिती देऊन आणि शिक्षक व शिक्षकेत्तर प्रमुख यांनी ग्रंथाल्याबद्दल आवश्यक माहिती नोंद करून घेतली आणि ग्रंथालयाचा कसा उपयोग करावयाचा, तसेच माहिती व ग्रंथाचा शोध कसा घ्यावयाचा ह्या संबधी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला सोमय्या ग्रुपचे श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, संचालिका सौ. अंकिता आंबटकर, प्रा. डॉ. पद्मनाभ ए. गाडगे, उपप्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे, ग्रंथपाल श्री. विवेक दुधलवार, श्री. धनंजय शेंडे, अन्य शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक प्रा. स्मृती नकले यांनी केले. दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेत मोलाचे योगदान दिले. सूत्रसंचालन स्वयंम पांडे यांनी तर PPT सादरीकरण मो. उबेद आणि स्नेहा पाझारे यांनी केले. आभार प्रदर्शन साक्षी बिजलपुरे यांनी केले.