ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार सुधाकर अडबाले यांच्या वाढदिवशी सुधाकरपर्व पुस्तकाचे प्रकाशन

आमदार सुधाकर अडबाले यांच्या कामगिरीचा लेखाजोखा प्रकाशित

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या मागील एका वर्षाच्या कार्यकाळातील कामगिरीचा सविस्तर आढावा देणारे “सुधाकरपर्व” पुस्तक त्यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर येथील निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आले.

या सोहळ्याला सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्रकाशन माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयदीप सोनखासकर, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, विमाशी संघाचे जिल्हा, तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

शुभेच्छा देण्यासाठी वणीचे आमदार संजय देरकर, आरमोरीचे आमदार रामदास मसराम, राजुऱ्याचे आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवी शिंदे, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी भेट देत अडबाले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विदर्भातून मोठ्या संख्येने शिक्षक, कर्मचारी, नागरिकांनी हजेरी लावली होती.

प्रकाशित पुस्तकात आमदार अडबाले यांच्या मागील एका वर्षाच्या कार्यकाळातील विधिमंडळातील उपस्थिती, विचारलेल्या प्रश्नांची संख्या, मांडलेले विषय तसेच विविध क्षेत्रांत केलेली कामे आणि विकास उपक्रमांचा तपशील समाविष्ट आहे. या आकडेवारीतून अडबाले यांच्या सक्रिय उपस्थितीबरोबरच जनहिताचे प्रश्न, ठराव आणि विशेष उल्लेख मांडण्याची त्यांची बांधिलकी दिसून येते.

शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. सभागृहाच्या माध्यमातून विविध प्रश्नांना त्यांनी मार्गी लावले. मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात, शिक्षकांचे असो वा सामाजिक, असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. भविष्यातही त्यांच्या हातून अधिक चांगले कार्य घडावे, अशा शुभेच्छा खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार श्री. व्हि. यू. डायगव्हाणे यांनी व्यक्त केल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये